‘बा’ : कस्तुरी सुगंध
‘बा-बापू हे नवभारताचे उभरता माय-बाप. कस्तुरीप्रमाणे बांचे जीवन सुगंधी. माते, तुझे ते बंदिखान्यातील मरण आम्ही कसे विसरू? पुण्याची ती समाधी म्हणजे भारताचे तीर्थक्षेत्र आहे. बा-बापूंचे जीवन म्हणजे राष्ट्राची अमर पुण्यपुंजी!’ साने गुरुजींच्या या शब्दांत बांची पुण्याई सामावलेली आहे तीच खरी संपत्ती आहे. आणि ती सदैव वृद्धिंगत होत राहो! हीच ‘बां’च्या १५० व्या जन्मजयंतीच्या निमित्ताने नम्र अपेक्षा आहे.......